मागील आठवड्यात वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात आला. वर्ष 1988 पासून हा दिवस लोकांत एड्सची जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस मानला जातो. पण काय तुम्हाला माहित आहे का, कोणाला सर्वप्रथम एड्स झाला होता आणि तो कसा झाला होता? संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, एड्स चिंपांजी या जातीच्या माकडामुळे झाला होता.
संशोधनानुसार, वर्ष 1908 मध्ये एक जखमी चिंपांजीने एका शिकार करणा-या व्यक्तीला नखाने खरचटले. ज्यानंतर त्याचे रक्त त्या शिकारीच्या अंगात गेले. त्या रक्तामुळे त्याच्या शरीरात इंफेक्शन (संसर्ग) पसरले. सांगितले जाते की, हा शिकारी कॅमेरूनच्या जंगलामध्ये चिंपांजीचा पाठलाग करत होता.
1980 मध्ये Gaetan Dugas नावाच्या गे व्यक्तीला एड्स पसरविण्याबाबत दोषी मानले गेले. गॅटन एक कॅनेडियन फ्लाईट अटेंडेंट होता, ज्याने अमेरिकेतील शेकडो लोकांना इन्फेक्ट करण्यासाठी मुद्दाम संबंध बनवले होते. या कारणामुळे या व्यक्तीला 'पेशंट झिरो' असे नाव देण्यात आले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील डॉक्टर्सनी सर्वप्रथम या व्हायरसचा शोध लावला. पुढील 10 वर्षात या व्हायरसमुळे अमेरिकेतील किमान 60 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews